उस्ताद आफाक हुसैन
- Team TabBhiBola

- Oct 18, 2020
- 1 min read
Updated: Jan 29, 2021
अ} जन्म, बालपण, प्रारंभिक शिक्षण :- उस्ताद आफाक हुसैन साहेबांचा जन्म नोव्हेंबर १९३० साली झाला. वयाच्या चौथ्या वर्षांपासून आपले आजोबा खलिफा उस्ताद अबिद हुसैन खॉं यांचेकडे त्यांनी प्राथमिक शिक्षणास सुरवात केली. उस्ताद अबिद हुसैन खॉं याना मुलगा नसल्यामुळे त्यांनी आपली मुलगी काझमी बेगम हिला तबला वादनात पारंगत केले. काझमी बेगम खुप बुद्धीमान होती. फारसी, अरबी व उर्दू या भाषांमध्ये पारंगत होती. तिने अबिद हुसैन खॉं साहेबांच्या अनेक रचना लिहून तसेच मुखोद्गत करून ठेवल्या होत्या. तिचे लग्न उस्ताद अबिद हुसैन खॉं साहेबांनी आपला पुतण्या वाजिद हुसैन यांच्याशी केले. उस्ताद आफाक हुसैन या दोघांचा मुलगा. त्यांचे आजोबा १९३६ साली वारल्यानंतर छोट्या आफाक ला त्याच्या आई-वडिलांनी तबला शिकवला.
ब} वादन वैशिष्ट्ये :- कोलकत्त्यामध्ये संगीताचे वातावरण चांगले असल्यामुळे उस्ताद आफाक हुसैन लखनौ सोडून कोलकत्त्यास रहायला गेले. त्यांच्या अप्रतिम साथ-संगतीमुळे उस्ताद बडे गुलाम अली खॉं साहेब व पुढे उस्ताद अमीर खॉं साहेब त्यांना अनेक संमेलनात साथीला नेऊ लागले. पुढे उस्ताद आफाक हुसैन लखनौला परतले व लखनौ संगीत अकादमी व नंतर दूरदर्शन केंद्रावर त्यांनी नोकरी पत्करली. उस्ताद आफाक हुसैन खॉं साहेबांचा तबल्यावरील हात अतिशय गोड, स्पष्ट व तयार होता. त्यांच्या तबला-वादनाची काही ध्वनी-मुद्रणेही उपलब्ध आहेत.
क} शिष्य :- उस्ताद आफाक हुसैन यांच्या शिष्यांमध्ये त्यांचे दोन पुत्र, इल्मास हुसैन (जन्म १९५७) आणि इल्यास हुसैन (जन्म १९७८) हे लखनौच्या समृद्ध घराण्याचा वारसा चालवीत आहेत.
ड} मृत्यू :- उस्ताद आफाक हुसैन साहेब १४ फेब्रुवारी १९९० रोजी पैगंबरवासी झाले.

Comments