उस्ताद इनाम अली खॉं साहेब
- Team TabBhiBola

- Oct 18, 2020
- 1 min read
Updated: Jan 28, 2021
१} जन्म :- उस्ताद ईनाम अली खॉं साहेबांचा जन्म १२ नोव्हेंबर १९२८ रोजी झाला. दिल्ली घराण्याचे मशहूर तबला नवाझ उस्ताद गामे खॉं साहेबांचे हे सुपुत्र होत. त्यांचे तबला वादनाचे शिक्षण आपल्या वडलांकडेच झाले. दिल्ली घराण्याचा खलिफापदाचा वारसा उस्ताद गामे खॉं साहेबांनंतर उस्ताद इनाम अली खॉं साहेबांकडेच आला.
२} वादन वैशिष्ट्य :- दिल्ली घराण्याच्या वादनपद्धतीची अतिशय कष्टाने साध्य केलेली सगळी खास वैशिष्ट्ये उस्ताद इनाम अली खॉं साहेबांच्या हातात उतरली होती. खास करून दोन बोटांच्या आघाताचा तबला उस्ताद इनाम अली खॉं साहेबांच्या हातात प्रकर्षाने दिसून यायचा. त्यामुळे दिल्ली घराण्याचा अस्सल खानदानी तबला त्यांच्या वादनात दिसून यायचा. उस्ताद इनाम अली खॉं साहेबांची तबला वादनाची तयारी आणि मांडणी चांगली होती. त्यांचा वादन विस्तार आणि विस्तार क्रिया ही रोज 'उपज' अंगाने होत असे, त्यामुळे तो विस्तार अतिशय नाविन्यपूर्ण वाटत असे. ताल, लय, पेशकार, कायदा, रेला वगैरे प्रकारांवर त्यांनी खूप विचार केला होता, त्यामुळे ते बराच वेळ ह्या विषयांवर चर्चा करीत असत.
३} शिष्य परिवार :- उस्ताद लतीफ अहमद खॉं, पं. सुधीर माईणकर हे उल्लेखनीय आहेत.
४} मृत्यू :- उस्ताद इनाम अली खॉं साहेबांचा मृत्यू २८ जानेवारी १९८८ रोजी झाला.

Comments