उस्ताद करामतुल्ला खॉं साहेब
- Team TabBhiBola

- Oct 18, 2020
- 1 min read
Updated: Jan 29, 2021
अ} जन्म आणि बालपण :- उस्ताद करामतुल्ला खॉं साहेब यांचा जन्म इ.स. १९१८ साली उत्तर प्रदेशातील रामपूर येथे झाला. फरुखाबाद घराण्याचे सुप्रसिद्ध तबलानवाझ उस्ताद मसीत खॉं साहेब यांचे हे पुत्र. यांनी वयाच्या सहाव्या वर्षांपासून वडलांकडून तबल्याची तालीम घेण्यास सुरवात केली.
ब} वादन वैशिष्ट्ये :- फरुखाबाद घराण्याचे असूनसुद्धा यांच्या तबलावादनावर बनारस घराण्याचा मोठा प्रभाव पडलेला होता. बायाँ सरळ ठेवीत असल्यामुळे बनारसच्या वादनपद्धतीपेक्षा तो अधिक घुमारदार वाजत असे. स्वतंत्र तबला वादनासाठी ते सर्वसाधारणपणे टिपेचा-लहान तोंडाचा तबला वापरत असत. उत्कृष्ट तयारी, बोलांचा सुस्पष्ट निकास आणि एकंदर तबला वादनाची आकर्षक मांडणी ह्या गुणांमुळे त्यांचे तबला वादन परिणामकारक आणि श्रोत्यांवर छाप पाडणारे व्हायचे. साथ-संगतीत हजरजबाबीपणा असल्यामुळे अनेक संगीत सम्मेलनांमधून तंतकारांच्या संगतीसाठी त्यांना नेहमी निमंत्रणे येत असत.
क} शिष्य परिवार :- त्यांच्या शिष्यांमध्ये पुत्र साबीर खॉं, नरेंद्र घोष, शंकर चॅटर्जी, अमर डे, कनाई दत्त, कमलेश चक्रवर्ती इ. यांचा समावेश आहे.
ड} मृत्यू :- त्यांचे एका दीर्घ आजाराने कोलकता येथे दि. ३ डिसेंबर १९७७ रोजी निधन झाले.

Comments