top of page

तबल्याची खासियत आणि तबला-पखवाज यातील फरक

  • Writer: Team TabBhiBola
    Team TabBhiBola
  • Oct 19, 2020
  • 1 min read

Updated: Jan 29, 2021


१) दोन कमी उंचीच्या ऊर्ध्वमुखी भागांपासून तबला हे वाद्य तयार होते. त्यामुळे हे वाद्य मृदंग वा पखवाजापेक्षा सहजसाध्य आहे.


२) मृदंग वा पखवाजापेक्षा तबल्यात डाव्या हाताचा वापर सहजतेने व जलदगतीने करता येतो.


३) पखवाजाला डाव्या बाजूला कणिक लावल्यामुळे आवाज घुमत नाही. परंतु डग्ग्यावर शाई लावल्यामुळे आवाज घुमतो व घिसकाम, मिंडकाम, घुमारा हे अगदी सहजतेने डग्ग्यातून निर्माण करता येऊ शकते.


४) मृदंग वा पखवाजावरील बोलांची आस व गुंज अधिक असते. त्यामुळे खुल्या बाजाचे बोल वाजविले जातात. परंतु तबल्यावर आस व गुंज मर्यादित असूनही दोन्ही बाजाचे बोल प्रभावीपणे वाजविता येतात.


५) विविध लयकारी, जलद गतींचे बोलही तबल्यावर तयारीने वाजविता येतात.


६) सर्व संगीत प्रकारांच्या साथीसाठी तबला हे वाद्य उपयुक्त ठरते. एकल वादनही अगदी प्रभावीपणे सादर करता येते.


७) तबला हे वाद्य सगळ्या स्वरात व आकारात उपलब्ध असल्याने ह्या वाद्याची संगीत क्षेत्रातील व्याप्ती मोठी आहे.


८) तबला या विषयावर अनेक पुस्तके उपलब्ध असल्याने व अनेक श्रेष्ठ गुरु तसेच उत्तम तबला वादक असल्याने, तबला हे वाद्य शिकण्यास मोलाची मदत होते.

Recent Posts

See All
सांगता

अशाप्रकारे सध्याच्या काळात 'तबला' या वाद्याला अतिशय प्रसिद्धी मिळाली आहे. आजच्या आधुनिक युगात शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, नाट्य...

 
 
 
तबल्याचे आधुनिक परिवर्तन

१) पूर्वी तबल्यासाठी एकाच जाड चामड्याचा वापर केला जात होता. परंतु पुढे एका जाड चामड्याऐवजी दोन पातळ चामड्याचा वापर करण्यात येऊ लागला....

 
 
 

Comments


bottom of page