top of page

तबल्याचे आधुनिक परिवर्तन

  • Writer: Team TabBhiBola
    Team TabBhiBola
  • Oct 19, 2020
  • 1 min read

Updated: Jan 29, 2021


१) पूर्वी तबल्यासाठी एकाच जाड चामड्याचा वापर केला जात होता. परंतु पुढे एका जाड चामड्याऐवजी दोन पातळ चामड्याचा वापर करण्यात येऊ लागला. पुडीसाठी बकऱ्याच्या चामड्याचा (कातडीचा) उपयोग होऊ लागला.


२) तबला व डग्गा यांच्या किनारीवर (चाटेवर) एक इंच लांबीची पट्टी ठेवण्यात आली.


३) पूर्वी वादीच्या ऐवजी दोरीचा वापर केला जायचा. पण त्यानंतर दोरीचा वापर करणे योग्य झाले नसावे. वादीमध्ये ताण देऊन खेचून (ताणून) धरण्याची क्षमता दोरीच्या क्षमतेपेक्षा जास्त होती. त्यामुळे पुढे, पुडी खेचून धरण्यासाठी दोरीच्या ऐवजी वादीचा वापर केला जाऊ लागला.


४) वादीमध्ये लाकडी गठ्ठयांचा वापर केला जाऊ लागला. लाकडी गठ्ठयांमुळे वादीला ताण देणे आणि तो ताण टिकवून ठेवणे सोप्पे जाऊ लागले.


५) गठ्ठे ठोकण्यासाठी हातोडीचा वापर होऊ लागला.


६) तबल्या प्रमाणेच डग्ग्यालाही शाई लावण्यात आली.


७) तबल्याच्या पुडीवरील ताणाचे नियंत्रण वादी व गठ्ठयांमुळे होत असते. त्या ऐवजी नट-बोल्ट किंवा चावी यांचाही वापर होऊ लागला. तसेच डग्ग्याला वादी शिवाय नुसती पुडी, भांड्यावर घट्ट बसवून डग्गा तयार करण्यात आला. तसेच तबल्याला आतून शाई लावण्याचाही प्रयोग करण्यात आला आहे. असे अनेक नव-नवीन आधुनिक बदल, प्रयोग तबल्यामध्ये करण्यात आले आहेत. पण हे बदल फारसे विकसित झाले नाहीत.


८) इलेकट्रॉनिक्स च्या सहाय्याने तबला-डग्गा सदृश आवाज, विशिष्ठ लयीत, स्वरात निर्माण करणारे एक आधुनिक यंत्रवाद्य बनविण्यात आले आहे. सर्व ठेके, लेहरे, ताल, तानपुरे अपेक्षित त्या स्वरात, लयीत वाजण्याची सोय या यंत्रवाद्यात उपलब्ध आहे.


अशाप्रकारे तबला-डग्ग्यामध्ये अनेक आधुनिक, नवनवीन बदल घडून आले. या बदलातूनच सध्याचा आधुनिक, प्रसिद्ध तबला-डग्गा निर्माण होऊन सर्व सामान्यांमध्ये अतिशय नावारूपास व प्रसिद्ध अवनद्ध वाद्य म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

Recent Posts

See All
सांगता

अशाप्रकारे सध्याच्या काळात 'तबला' या वाद्याला अतिशय प्रसिद्धी मिळाली आहे. आजच्या आधुनिक युगात शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, नाट्य...

 
 
 

Comments


bottom of page