स्वर वाद्यांची साथ-संगत
- Team TabBhiBola

- Oct 18, 2020
- 1 min read
Updated: Jan 29, 2021
तंतुवाद्यास संगत करताना तबलावादकास आपली कला सादर करण्याची जास्त संधी असते. तंतुवादक जेंव्हा आपली गत पेश करतो, तेंव्हा तबलावादकाकडून सुरवातीस एखादी उठाण वाजविली जाते किंवा पेशकाराचे पलटे वाजवून सम साधली जाते. तबलावादक ताल वाजवू लागल्यावर, तंतुवादक ज्यावेळी ताना, पलटे इ. वाजवून अधून मधून गतीचे मुख वाजवितो, त्यावेळी तबलावादक तुकडे वा कायदे वाजवून, प्रसंगी लयकारीयुक्त बोलही वाजवितो. द्रुत गत चालू होताच 'लडन्त' व सवाल-जवाब शैलीने संगत केली जाते. अतिद्रुत लयीत अतिशय तयारीने ताल वाजवावा लागतो व शेवटी तिहाईने वादन संपविले जाते. एकमेकांचे वादनातील बारकावे लक्षात घेऊन, एकमेकांना समजून घेऊन, दोघांनी समजूतदारपणे केलेली साथ-संगत ह्यातून एक सुंदर कलाकृती निर्माण होते. साथ-संगत करीत असताना तबलावादकाला आपली कला सादर करण्यासाठी पूर्ण वाव असतो. परंतु साथ-संगत करीत असताना मुख्य वादकाची कुचंबणा होणार नाही, त्याचबरोबर आपले स्वतंत्र तबला वादन होणार नाही याचे तबलावादकाने सतत भान ठेवणे आवश्यक असते.

Comments