top of page

साथ-संगत आणि त्यातील रसनिष्पत्ती

  • Writer: Team TabBhiBola
    Team TabBhiBola
  • Oct 18, 2020
  • 2 min read

Updated: Jan 29, 2021


तबला हे मुळात एक तालवाद्य आहे. या वाद्याचा विकास ख्याल गायनाची साथ-संगत करताना झाली आहे. पुढे या वाद्याची नाद-क्षमता व उपयुक्तता यामुळे हे वाद्य सर्वच संगीत प्रकारांच्या साथीस वाजविले जाऊ लागले. त्यामुळे स्वतंत्र तबला वादनाबरोबरच साथ-संगतीतही तबला या वाद्याला महत्वाचे स्थान आहे. एकवेळ स्वतंत्र वादन हे पाठांतर व रियाज करून सादर केले जाऊ शकते मात्र साथ-संगतीचे तसे नसते. साथ-संगतीसाठी लयीचे ज्ञान, रियाज व अनुभव अशा अनेक बाबींची आवश्यकता असते. साथ-संगत या विषयाची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे, तबल्याच्या प्रत्येक प्रकाराची साथ-संगत कशी केली जाते हे समजून घेणे आवश्यक आहे.


साथ - संगतीचे मुख्य तीन प्रकार -


१) गायनाची साथ संगत

२) वादनाची साथ संगत

३) नृत्याची साथ संगत


गायनात धृपद, धमार, ख्याल गायन, भजन, सुगम संगीत असे अनेक प्रकार येतात. प्रत्येक प्रकारात साथ करताना तबलावादकाला त्याची साथ, त्या त्या प्रकाराला उठावदार, मधुर, पोषक करावी लागते. साथ संगत करणाऱ्या तबलावादकास, स्वर-संगीताची गोडी वाटणे, त्याबद्दल आत्मीयता वाटणे, इ. गोष्टींची आवश्यकता असते. साथ करणारा तबलावादक एक जाणकार श्रोता असला पाहिजे. त्याची कल्पनाशक्ती, निरीक्षण शक्ती इ. अत्यंत तीक्ष्ण हवी. आदर्श साथ म्हणजे, प्रमुख कलाकाराच्या कलाकृतीस योग्य हातभार लागणे होय. त्याचप्रकारे साथ करण्यासाठी सम-विषम मात्रांच्या तालांमध्ये स्वतंत्र वादन करण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे. साथ-संगत यामध्येही फरक असतो. काही गानप्रकारात संगीताची 'साथ' करावी लागते, तर काही संगीत प्रकारांची 'संगत' करावी लागते.


साथ - संगतीची मूलभूत तत्त्वे -


१) गाण्याची लय ओळखणे.

२) गाण्याची सम ओळखणे.

३) संगीत प्रकार ओळखणे.

४) मात्रा मोजून ताल ओळखणे.

५) सूर ओळखणे. ( स्वर-ज्ञान )

६) तबला, स्वरात मिळवता येणे.


याशिवाय संगीताचे शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम, वाद्य संगीत आणि नृत्य इ. विविध प्रकार आहेत. या सर्वच प्रकारांच्या साथीसाठी अधिक सखोल अभ्यासाची आवश्यकता आहे, तसेच गुरूंच्या योग्य मार्गदर्शनाखाली रियाजाची आवश्यकता असते.


साथ - संगतीसाठी लागणाऱ्या काही महत्वाच्या बाबी -


१) आसदार व सुरेल ठेका.

२) हाताची तयारी ( वेग ) व दमसास.

३) लय व लायकारींचा अभ्यास.

४) किस्म, तुकडे, तिहायांची विविधता.

५) प्रसंगावधान व समयसूचकता.

Recent Posts

See All
वाद्यसंगीताची साथसंगत -

१) गायकी अंग व तंतकारी अंग या दोन्ही प्रकारांची माहिती २) गायकी अंगात ख्यालाप्रमाणेच साथ परंतु हाताची तयारीसुद्धा अपेक्षित ३) तंतकारी...

 
 
 
ख्यालाची साथसंगत -

१) नादमय, सशक्त आणि आसदार ठेका २) लयदारी ३) बडा व छोटा ख्याल यांच्या मांडणीचा अभ्यास. (ठेकापूर्व आलाप, नोमतोम, मुखडा, सम, बंदिशीची लय,...

 
 
 
उपशास्त्रीय संगीताची साथसंगत -

१) सशक्त व नाजूक अशा दोन्ही प्रकारे वाजविण्याची क्षमता २) ठुमरी, गज़ल, नाट्यगीत, भजन, टप्पा इ. प्रकारांची आणि त्यासोबत वाजल्या जाणाऱ्या...

 
 
 

Comments


bottom of page