Search
मरहूम उस्ताद मियाँ सलारी खॉं साहेब
- Team TabBhiBola

- Oct 18, 2020
- 1 min read
Updated: Jan 29, 2021
मरहूम उस्ताद मियाँ सलारी खॉं साहेब हे उस्ताद चुडियावाले इमाम बक्श खॉं साहेबांचे समकालीन. त्यांच्या जन्म मृत्यूच्या तारखा उपलब्ध नाहीत. एक उत्कृष्ट तबलानवाझ व रचनाकार म्हणून त्यांचे नाव पूरबच्या इतिहासात अजरामर झालेले आहे. उस्ताद हाजी साहेबांचे ते एक ज्येष्ठ शागीर्द होते. मियाँ हाजी साहेबांच्या रचनांना त्यांनी दिलेले जबाब इतके अप्रतिम आहेत की हाजी साहेबांच्या रचनासुद्धा फिक्या पडाव्यात. उत्कृष्ट लयबंधांचा आणि योग्य बोलांचा वापर करून रचना बनवण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. त्यांच्या अनेक रचना आजही प्रसिद्ध आहेत आणि ऐकायला मिळतात आणि त्यावरून त्यांच्या अमोघ कल्पनाशक्तीचा व प्रतिभेचा प्रत्यय तबला वादकांना नेहमी येत असतो.

Comments