Search
अनुरूप साथ-संगत
- Team TabBhiBola

- Oct 18, 2020
- 1 min read
Updated: Jan 29, 2021
अशाप्रकारे शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुगम संगीताची, त्याचबरोबर वाद्य संगीत व
नृत्याची साथ-संगत करताना उपरोक्त सिद्धांत महत्वाचे आहेत. शास्त्रीय संगीताला सुगम संगीतासारखी चंचल साथ करणे ज्याप्रमाणे संयुक्तिक ठरणार नाही, त्याचप्रमाणे उपशास्त्रीय संगीताला शास्त्रीय संगीताप्रमाणे संथ अशा प्रकारची साथ करणे उचित ठरणार नाही. विविध संगीत प्रकारांसाठी साथ करण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्या त्या गीतप्रकारांना अनुरूप अशी साथ-संगत केली तरच मैफिल यशस्वी होते.
अशाप्रकारे साथ-संगतीसाठी तबलावादकाला प्रचंड मेहनत, अपार कष्ट, रियाज,
गुरुनिष्ठता आणि गुरूंच्या योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. योग्य पद्धतीने, योग्य विचार आणि अभ्यास करून केलेली साथ-संगत नेहेमीच यशस्वी होते.

Comments