top of page

व्याख्या - संगीत, नाद, स्वर, लय, बोल, ठेका, किस्म, तिगून, चौगुन, तुकडे

  • Writer: Team TabBhiBola
    Team TabBhiBola
  • Dec 14, 2020
  • 1 min read

Updated: Dec 18, 2023


१) संगीत - गायन, वादन व नृत्य या तिन्ही श्रेष्ठ कलांच्या मिलाफास 'संगीत' असे म्हणतात.

स्वर, लय व अभिनय यांचा उपयोग करून सादर केल्या जाणाऱ्या कलेस 'संगीत' असे म्हणतात.

संगीतात गायन, वादन आणि नृत्य यांचा समावेश होतो.


२) नाद - स्वर निर्मितीच्या शक्यता असलेल्या ध्वनीस 'नाद' असे म्हणतात.


३) स्वर - निश्चित कंपनसंख्या असणाऱ्या कर्णमधूर नादास 'स्वर' असे म्हणतात.


४) लय - कालाच्या समान गतीस 'लय' असे म्हणतात.

आघातांनी निर्माण झालेल्या समबद्ध गतीस 'लय' असे म्हणतात.

दोन मात्रांमधील समान विश्रांतीस 'लय' असे म्हणतात.

लयीचे, विलंबित लय, मध्य लय व द्रुत लय असे तीन प्रकार आहेत.


५) बोल - तबल्यावर वाजवल्या जाणाऱ्या विविध अक्षरांना किंवा अक्षर समूहांना 'बोल' असे म्हणतात.


६) ठेका - तालाच्या मूळ अक्षरांना 'ठेका' असे म्हणतात.

ठेका ही तालाची पहिली बंदिश मानली जाते.


७) किस्म - तालाचे स्वरूप कायम ठेवून, तबल्यातील विविध बोलांचा उपयोग करून, ठेक्याचे केलेले विविध प्रकार म्हणजे 'किस्म' होय.

'किस्म'चा शब्दशः अर्थ म्हणजे 'प्रकार'.

तालाच्या किंवा ठेक्याच्या विविध प्रकारास 'किस्म' असे म्हणतात.

तालाचे स्वरूप न बदलता अक्षरांची अदला-बदल करून अथवा दुसऱ्या बोलांचा उपयोग करून, मात्रांबरोबर आड वळण घेऊन, वाजविल्या जाणाऱ्या ठेक्याच्या प्रकाराला 'किस्म' असे म्हणतात.


८) तिगून - एखादी रचना मूळ लयीच्या वेळात तीन (३) वेळा वाजविण्याच्या अथवा म्हणण्याच्या क्रियेस 'तिगून' असे म्हणतात.


९) चौगुन - एखादी रचना मूळ लयीच्या वेळात चार (४) वेळा वाजविण्याच्या अथवा म्हणण्याच्या क्रियेस 'चौगुन' असे म्हणतात.


१०) तुकडे - छोट्या छोट्या बोल समूहांना एकत्र गुंफून तयार होणाऱ्या, साधारणपणे एक ते दोन आवर्तनांच्या आकर्षक रचनेस, 'तुकडा' असे म्हणतात. बहुतेकवेळा तुकड्याच्या शेवटी तिहाई असते.


Recent Posts

See All
व्याख्या - मात्रा, ताल, सम, टाळी, खाली/काल, विभाग/खंड, दुगुन/दुप्पट, आवर्तन

१) मात्रा - ताल मोजण्याच्या परिमाणास 'मात्रा' असे म्हणातात. २) ताल - संगीतामध्ये काल मोजण्याच्या परिमाणास 'ताल' असे म्हणतात. गायन, वादन...

 
 
 
व्याख्या-आमद, त्रिपल्ली, चलन, कमाली-चक्रदार, चक्रदार, गत-कायदा, परण, पेशकार, नौहक्का, रौ,बाँट,लय

१) आमद - आमद म्हणजे नृत्याची साथ करताना तबल्यावर अथवा पखवाजावर प्रारंभी जी सुंदर व आकर्षक बोलरचना वाजविली जाते, त्यास 'आमद' किंवा 'सलामी'...

 
 
 

1 commentaire


VLOG GAMING YT
VLOG GAMING YT
06 mai 2023

Good thanks for your support

J'aime
bottom of page