व्याख्या - मात्रा, ताल, सम, टाळी, खाली/काल, विभाग/खंड, दुगुन/दुप्पट, आवर्तन
- Team TabBhiBola
- Dec 16, 2020
- 1 min read
Updated: Dec 18, 2023
१) मात्रा - ताल मोजण्याच्या परिमाणास 'मात्रा' असे म्हणातात.
२) ताल - संगीतामध्ये काल मोजण्याच्या परिमाणास 'ताल' असे म्हणतात.
गायन, वादन आणि नृत्य यांना स्थिरता प्राप्त करून देणाऱ्या, टाळी, खाली आणि बोटांच्या सहाय्याने दाखविल्या जाणाऱ्या, एका आवर्तनाच्या, खंडबद्ध काल रचनेस 'ताल' असे म्हणतात.
३) सम - तालाच्या प्रथम मात्रेस किंवा तालाच्या आरंभ बिंदूस 'सम' असे म्हणतात.
४) टाळी - तालातील प्रत्येक विभागाच्या पहिल्या मात्रेवर टाळी किंवा खालीची योजना केलेली असते.
हाताने ताल दाखविताना जेंव्हा विशिष्ट मात्रेवर टाळी वाजविली जाते, तेंव्हा त्यास 'टाळी' असे म्हणतात.
५) खाली / काल - ताल आवर्तनात कमी जोरकस बोलांच्या विभागास 'खाली' किंवा 'काल' असे म्हणतात.
हाताने ताल दाखविताना ज्या विशिष्ट मात्रेवरती हात दूर फेकला जातो त्या क्रियेस 'खाली' किंवा 'काल' असे म्हणतात.
सर्वसाधारणपणे तालाच्या अर्ध्या भागानंतर कालाची योजना केलेली असते.
६) विभाग किंवा खंड - तालाच्या मात्रा, सम, काल आणि टाळी यांना अनुसरुन तालाचे जे वेगवेगळे भाग पाडले जातात, त्यांना 'विभाग' किंवा 'खंड' असे म्हणतात.
७ ) दुगुन किंवा दुप्पट - एखादी रचना मूळ लयीच्या वेळेत दोन वेळा म्हणण्याच्या अथवा वाजवण्याच्या क्रियेस 'दुगुन' किंवा 'दुप्पट' असे म्हणतात.
८) आवर्तन - एखाद्या तालाच्या ठराविक लयीमध्ये समेपासून सुरुवात करुन, पुन्हा ती सम येईपर्यंतच्या मात्रा कालास 'आवर्तन' असे म्हणतात.
YouTube Link - https://youtu.be/JTGrCdfprhw?si=7OxTSOhe71hZSNfs
