प्रश्न-पत्र - ९
- Team TabBhiBola

- Nov 12, 2024
- 2 min read
Updated: Jan 18
प्रश्न-पत्रिका – ९
खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत.
खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत.
सगळ्या रिकाम्या जागांचे प्रश्न हे, ‘एका वाक्यात उत्तरे लिहा, जोड्या लावा, चूक की बरोबर ते लिहा, योग्य पर्याय निवडा’ यांसाठी देखील उपयुक्त आहेत.
सगळे प्रश्नपत्र हे tabbhibola या वेबसाइट च्या आधारावर तयार केले गेले आहेत.
१] रिकाम्या जागा भरा. (प्रत्येकी १ गुण)
१) गायन, वादन, नृत्य यांच्यातील वेळेच्या समान अंतरास ............... असे म्हणतात.
२) अतिशय संथ लयीस ................ लय असे म्हणतात.
३) ज्या वेळेस दोन मात्रांमधील अंतर फार जास्त असते तेव्हा त्या लयीस ................ लय असे म्हणतात.
४) मध्यम गतीने चालणारी लय म्हणजे ................ .
५) विलंबित व द्रुत लयीच्या मधल्या लयीस ............... लय असे म्हणतात.
६) जलद गतीने चालणाऱ्या लयीस ............ लय असे म्हणतात.
७) विलंबित लयीची चौगुन वा मध्य लयीची दुगून म्हणजेच ............ लय होय.
८) लयीचे मुख्य ........... प्रकार आहेत.
९) लयकारीचे मुख्य ............... प्रकार आहेत.
१०) एका मात्रेच्या कालावधीत एक मात्रा म्हणणे अथवा वाजविणे याला ............... असे म्हणतात.
११) एका मात्रेच्या कालावधीत दोन मात्रा म्हणणे अथवा वाजविणे याला ............... असे म्हणतात.
१२) एका मात्रेच्या कालावधीत तीन मात्रा म्हणणे अथवा वाजविणे याला ............... असे म्हणतात.
१३) एका मात्रेच्या कालावधीत चार मात्रा म्हणणे अथवा वाजविणे याला ............... असे म्हणतात.
१४) वक्र लयीचे मुख्य ............ प्रकार आहेत.
१५) चार मात्रांच्या कालावधीत पाच मात्रा मोजणे अथवा वाजविणे यास ................ असे म्हणतात.
१६) चार मात्रांच्या कालावधीत सहा मात्रा मोजणे अथवा वाजविणे यास ................ असे म्हणतात.
१७) चार मात्रांच्या कालावधीत सात मात्रा मोजणे अथवा वाजविणे यास ................ असे म्हणतात.
१८) मात्रेचा सर्वात लहान भाग म्हणजे ............ होय.
१९) संगीतातील लय दाखविण्यासाठी जी वाद्ये वापरली/वाजविली जातात त्यांना ............ वाद्ये असे म्हणतात.
२०) संगीत कलेची ................ आधारतत्व आहेत.
२१) आघातातून निर्माण होणाऱ्या समान गतीला ............... असे म्हणतात.
२२) गायन, वादन व नृत्य या तीनही श्रेष्ठ कलांच्या मिलाफास ................. असे म्हणतात.
२३) पखवाज हे ............... वाद्य आहे तर सनई हे ............. वाद्य आहे.
२४) साथ-संगत करताना .............. ठेका वाजविणे महत्वाचे असते.
२५) अक्षरं किंवा लघुंमध्ये बदल केले तर ............ होते.
उत्तरे -
१) लय २) विलंबित ३) विलंबित ४) मध्य ५) मध्य ६) द्रुत ७) द्रुत ८) तीन ९) दोन १०) एकपट ११) दुप्पट १२) तिप्पट १३) चौपट १४) तीन १५) कुआड १६) आड १७) बिआड १८) लघु १९) लय २०) दोन २१) लय २२) संगीत २३) चर्म/अवनद्ध/ताल, स्वर २४) लयबद्ध २५) लयकारी

Comments