प्रश्न-पत्र - ७
- Team TabBhiBola

- Nov 11, 2024
- 2 min read
Updated: Jan 18
प्रश्न-पत्रिका – ७
खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत.
खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत.
सगळ्या रिकाम्या जागांचे प्रश्न हे, ‘एका वाक्यात उत्तरे लिहा, जोड्या लावा,
चूक की बरोबर ते लिहा, योग्य पर्याय निवडा’ यांसाठी देखील उपयुक्त
आहेत.
सगळे प्रश्नपत्र हे tabbhibola या वेबसाइट च्या आधारावर तयार केले गेले
आहेत.
१] रिकाम्या जागा भरा. (प्रत्येकी १ गुण)
१) कर्नाटक संगीतात ............. मोठ्या प्रमाणात गायिली जाते.
२) कर्नाटक ताल-पद्धतीमध्ये मुख्य सात ताल मानले जातात. त्यालाच ............. ताल किंवा ............ असे म्हंटले जाते.
३) साथ-संगतीचे मुख्य ........... प्रकार आहेत.
४) धृपद-धमार गायकी लोप पावल्यानंतर .......... गायकीचा प्रचार व प्रसार झाला.
५) धृपद ही ......... प्रधान तर ख्याल ही .......... प्रधान गायकी आहे.
६) ख्याल गायकीचे .......... प्रकार आहेत.
७) बडा ख्याल .......... लयीत गायला जातो.
८) छोटा ख्याल .......... लयीत गायला जातो.
९) तराणा ........... लयीत गायला जातो.
१०) छोटा ख्यालानंतर ............ हा गीतप्रकार गायला जातो.
११) ठुमरी, गझल, दादरा, टप्पा, नाट्य-संगीत हे गायन प्रकार .................. संगीतामध्ये येतात.
१२) ठुमकत चालणाऱ्या व अभिनयासह गीत आळविणाऱ्या रमणिकेच्या आविष्कारातून ............. गायकीचा जन्म झाला.
१३) 'ठुमरी' या शब्दाचा संबंध ........... या क्रियापदाशी जोडला गेलेला आहे.
१४) बहुतांश ठुमऱ्या या ............ तालात गायल्या जातात.
१५) 'टप्पा' हा प्रामुख्याने ............. भाषेत रचलेला असतो व तो अवघड अशा ............. या तालात गायला जातो.
१६) सुगम संगीताला ................ आणि .............. गायकी असे म्हणतात.
१७) भजन ही ............. गायकी आहे.
१८) 'भावगीत' या गीतप्रकाराला ............. संगीतामध्ये महत्वाचे स्थान आहे.
१९) स्थिरपणाने स्थापित असणे या अर्थाच्या 'तल' या धातूपासून .............. हा शब्द अस्तित्वात आला.
२०) क्रियेने मापाला जाणारा 'काल' म्हणजे ........... होय.
२१) संगीत रचनांचा 'काल' मोजण्याचे परिमाण म्हणजे ................ होय.
२२) हाताने मोजला जाणारा तो ............ .
२३) तबला वादनातील ताल ही क्रिया ............. माध्यमातून होते.
२४) स्वतंत्र तबला वादनाचे ............. भाग असतात.
२५) ................ मुळे तालाचे दोन भाग होतात.
उत्तरे -
१) सरगम २) 'सप्तसूड', 'सप्ततालम' (सप्तसुलादी ताल) ३) तीन ४) ख्याल ५) ताल, स्वर ६) दोन ७) विलंबित ८) द्रुत ९) द्रुत/अतिद्रुत १०) तराणा ११) उपशास्त्रीय १२) ठुमरी १३) 'ठुमकणे' १४) दीपचंदी १५) पंजाबी, टप्पा १६) शब्दप्रधान, भावप्रधान १७) भक्तीरसपूर्ण १८) सुगम १९) ताल २०) ताल २१) ताल २२) ताल २३) ठेक्याच्या २४) दोन २५) खाली-भरी

Comments