प्रश्न-पत्र - ६
- Team TabBhiBola
- Nov 10, 2024
- 2 min read
Updated: Jan 18
प्रश्न-पत्रिका – ६
खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत.
खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत.
सगळ्या रिकाम्या जागांचे प्रश्न हे, ‘एका वाक्यात उत्तरे लिहा, जोड्या लावा,
चूक की बरोबर ते लिहा, योग्य पर्याय निवडा’ यांसाठी देखील उपयुक्त
आहेत.
सगळे प्रश्नपत्र हे tabbhibola या वेबसाइट च्या आधारावर तयार केले गेले
आहेत.
१] रिकाम्या जागा भरा. (प्रत्येकी १ गुण)
१) नगाऱ्यास ........... किंवा ............ असेही म्हणतात.
२) सनई बरोबर साथीचे वाद्य म्हणून ............. या वाद्याचा उपयोग केला जातो.
३) घुमट हे वाद्य ............ ............. बनवितात.
४) ढोलाचे जोड वाद्य म्हणून ........... या वाद्याचे वादन केले जाते.
५) संत मीराबाई यांच्या हातात असलेले तंतू वाद्य म्हणजे ........... होय.
६) एकतारी या वाद्याला .......... तार असते.
७) झांज या वाद्याचा उपयोग .......... दाखविण्यासाठी होतो.
८) तारा असणाऱ्या वाद्यास ......... वाद्य असे म्हणतात.
९) धनुष्याची दोरी हे ........... वाद्याचे उगम-स्थान मानले जाते.
१०) तंतू वाद्याचे ......... प्रकार असतात.
११) .......... वाद्य आणि .......... वाद्य हे तंतू वाद्याचे दोन प्रकार आहेत.
१२) नखाने वाजविली जाणारी वाद्य म्हणजे ........... तर गजाने वाजविली जाणारी वाद्य म्हणजे ............ होय.
१३) हवेचा वापर करून आवाज निर्माण करणाऱ्या वाद्यास .......... वाद्य असे म्हणतात.
१४) सुषिर वाद्याचे ......... प्रकार असतात.
१५) भांड्याच्या तोंडावर चामडे मढवून तयार करण्यात येणाऱ्या वाद्यास ............ वाद्ये असे म्हणतात.
१६) कुठल्याही भरीव वस्तूवर आघात करून वाजविल्या जाणाऱ्या वाद्यास ............. वाद्य असे म्हणतात.
१७) .......... वाद्ये सुरात मिळविता येत नाहीत.
१८) .......... या वाद्याचा आकार साधारणपणे आपल्याकडील पखवाजाप्रमाणे असतो.
१९) मृदंगम या वाद्याच्या उजव्या पुडीला ........... असे म्हणतात.
२०) मृदंगम या वाद्याच्या डाव्या पुडीला ........... असे म्हणतात.
२१) ........... या स्वर-वाद्याच्या साथीला 'ताविल' हे ताल-वाद्य वाजविले जाते.
२२) 'नागस्वरम' व 'ताविल' या वाद्यमेळ्यास ............ असे म्हणतात.
२३) 'घटम्' वाद्य हे ......... .. तयार केले जाते.
२४) मृदंगम या वाद्याच्या जोडीला साथ-संगत स्वरुपात ........... या ताल-वाद्याचे वादन केले जाते.
२५) 'विधिग्ध' संगीताच्या साथीबरोबर .......... हे ताल-वाद्य नेहेमी वापरतात.
उत्तरे -
१) 'दुंदुभी', 'भेरी' २) 'चौघडा' ३) भाजलेल्या मातीपासून ४) ताशा ५) एकतारी ६) एक ७) लय ८) तंतू ९) तंतू १०) दोन ११) तत्, वितत् १२) तत् वाद्य, वितत् वाद्य १३) सुषिर १४) दोन १५) 'अवनद्ध' १६) 'घन' १७) घन १८) मृदंगम १९) 'वलनतलै' २०) 'तोप्पी' २१) 'नागस्वरम' २२) 'पेरीयमेलम' २३) मातीपासून २४) घटम २५) घटम
Recent Posts
See Allप्रश्न-पत्रिका – १० खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत. खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत. सगळ्या...
प्रश्न-पत्रिका – ९ खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत. खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत. सगळ्या...
प्रश्न-पत्रिका – ८ खालील प्रश्न प्रत्येकी १ गुणांना आहेत. खालील प्रश्नांची उत्तरं प्रश्न-पत्रिकेच्या शेवटी दिलेली आहेत. सगळ्या...
Comments