top of page

भारतीय लोकसंगीतात वापरल्या जाणाऱ्या वाद्यांचा अभ्यास

  • Writer: Team TabBhiBola
    Team TabBhiBola
  • Oct 18, 2020
  • 1 min read

Updated: Jan 29, 2021


भारतीय संगीतात लोकसंगीताला फार महत्व आहे. हे लोकसंगीत फार पुरातन काळापासून अस्तित्वात असून भारतातील अनेक राज्यांशी, त्यांच्या संस्कृतीशी ते निगडित आहे. प्रत्येक राज्यातील नैसर्गिक वैशिष्ट्ये, चालीरिती, धर्म, जाती व परंपरा इ. सर्वांचा लोकसंगीतावर ठसा उमटलेला आहे. ग्रामीण भागात व खेडो-पाडी होणारे उत्सव, मिरवणुका, धार्मिक-पारंपरिक समारंभ यात गायल्या-म्हंटल्या जाणाऱ्या संगीतासाठी निरनिराळ्या वाद्यांचा वापर केला जातो. त्या संगीतात त्या त्या प्रांताप्रमाणे भाषा शैलीला अनुसरून शब्दरचना व स्वररचना केलेली आढळून येते.


या रचना सोप्या व सरळ भाषेत केलेल्या आढळून येतात. त्यांना तालाचे असे खास बंधन नसते. ठराविक तालांचेच वादन होते. त्यात 'सम व काल' दाखविला जातो. त्यात प्रामुख्याने अवनद्ध वाद्ये जास्त प्रमाणात आढळून येतात. घन वाद्ये व तंतू वाद्यांचा वापर अवनद्ध वाद्यांच्या मानाने फारच कमी असतो. या सर्व वाद्यांचा वापर लय देण्यासाठी केला जातो.


लोकसंगीतातील प्रमुख अवनद्ध वाद्ये : - नगारा, ढोल, चौघडा, खोळ, नाळ, डमरू, ताशा, घुमट, खंजिरी ( दिमडी,डफ, हलगी ) संबळ, ढोलकी, चोंडकं, बगलबच्चा इ.


लोकसंगीतातील प्रमुख घन वाद्ये : - झांज, चिपळ्या, घंटा, घुंगरू इ.


लोकसंगीतातील प्रमुख तंतू वाद्ये - एकतारी, तुणतुणे इ.

Recent Posts

See All
पखवाजावर वाजविले जाणारे वर्ण आणि त्यांची निकास पद्धती -

पखवाज हे वाद्य केव्हा, कोणी, कसे निर्माण केले, याबाबत ठोसपणे माहिती कोणत्याही ग्रंथात आढळून येत नसली तरी या अवनद्ध वाद्याची उत्पत्ती...

 
 
 
पखवाज/पखावज -

भगवान शंकराजवळील डमरू हे सर्वात प्राचीन वाद्य आहे. या आधारावर पखवाजाची उत्पत्ती झाली. पखवाज या वाद्याच्या प्राचीनतेचा पुरावा ऋग्वेदात...

 
 
 
पाश्चात्त्य संगीतातील वाद्यांची थोडक्यात माहिती

पाश्चात्त्य अवनद्ध वाद्यांचा विकास कसा झाला याचे अध्ययन केल्यानंतर असे लक्षात येते, की या वाद्यांच्या निर्मितीमध्ये सुरुवातीला दगड, हाडे,...

 
 
 

Comentários


bottom of page