Search
रियाजाची उद्दिष्टे -
- Team TabBhiBola

- May 24, 2022
- 1 min read
Updated: Aug 21, 2022
१) तंत्र विकसित करणे (बोटांच्या स्वतंत्र व संयुक्त हालचाली सहज करता येणे, डग्ग्यावरील विविध क्रिया समजून घेणे, हात व बोटांच्या हालचालीमध्ये लवचिकता आणणे इ.)
२) बोटांना वजन प्राप्त करणे. मृदू, कठोर तसेच अपेक्षित नाद निर्माण करता येणे.
३) गतिमानता (कायदा, रेला, लग्गी, ठेके, गत-तुकडा)
४) सलगता : बुद्धी व हात यांमध्ये समन्वय साधणे.
५) लयीवर प्रभुत्व मिळविणे.
६) लयकारी करता येणे.
७) पढंत करता येणे (स्पष्ट बोलोच्चार, टाळी धरून, ताल धरुन, ठेका धरुन, रेला वाजवीत, बंदिश गात)
८) रियाज करून साध्य केलेली उद्दिष्टे हातातून व बुद्धीतून निसटून जाऊ नयेत तसेच त्यांना अधिक झळाळी प्राप्त व्हावी म्हणून त्यांची उजळणी करीत राहणे.

Comments