Search
व्याख्या अभ्यासल्यावर रियाज संकल्पनेचा अर्थ खालील प्रकारे मांडता येईल -
- Team TabBhiBola

- May 24, 2022
- 1 min read
Updated: Aug 21, 2022
१) रियाजाचा संबंध केवळ एखादी क्रिया समजण्याशी नसून ती क्रिया समजून करण्याशी आहे.
२) कलाजीवनात अगदी पहिल्या दिवसापासून अखेरच्या दिवसापर्यंत करावी लागणारी गोष्ट म्हणजे रियाज.
३) रियाज प्रक्रियेतील सर्वात मोठा व महत्वाचा घटक म्हणजे सातत्याने केला जाणारा तंत्राचा सराव.
४) तालमीतून मिळालेले ज्ञान अधिकाधिक तेजस्वी करण्याचा मार्ग म्हणजे रियाज.
५) रियाजासाठी जबरदस्त इच्छाशक्ती, जिद्द, शारीरिक व मानसिक कणखरपणा या गुणांची गरज असते.
६) काळजीपूर्वक रियाजामुळे यश-कीर्ती तर लाभतेच पण आत्मोन्नतीही साध्य होते.
६) रियाजाचे उद्दिष्ट जरी एकसमान असले तरी रियाजाच्या पद्धती व्यक्तिगणिक बदलत जातात.

Comments