पं. विष्णू नारायण भातखंडे ताल-लिपी पद्धती
- Team TabBhiBola
- Dec 14, 2020
- 1 min read
Updated: Dec 4, 2023
या ताल-लिपी पद्धतीचे निर्माते स्व. पं. विष्णू नारायण भातखंडे हे होत. या ताल-लिपी पद्धतीला 'भातखंडे ताल-लिपी पद्धती' असे म्हणतात. ही ताल-लिपी पद्धती समजण्यास व लिहिण्यास अतिशय सोप्पी आहे.
या ताल लिपी पद्धतीत वापरण्यात येणारी चिन्हे खालीलप्रमाणे :-
१) एका मात्रेत एक मात्रा :- प्रत्येक मात्रेवरती त्या त्या मात्रेचे आकडे लिहितात.
उदा. १ २ ३
धा, धिं, ना इ.
२) खंड / विभाग :- खंड / विभाग संपल्यावर '।' हे चिन्ह देतात. (उभी रेष / दंड)
उदा. धा धिं ना । धा तिं ना ।
३) समेचं चिन्ह :- × (फुली) हे चिन्ह देतात.
४) कालाचे / खालीचे चिन्ह :- O (पोकळ गोल) हे चिन्ह देतात.
५) एका मात्रेत एकापेक्षा जास्त मात्रा :- सर्व मात्रा मिळून त्या मात्रेखाली अर्ध चंद्र देतात.
६) टाळी :- ज्या मात्रेवर टाळी असते त्या मात्रेच्या खाली त्या टाळीचा आकडा लिहितात.
उदा. २,३,४ इ.
७) मात्रा वाढविणे :- मात्रा वाढवायची असल्यास त्या मात्रेच्यापुढे 'S' 'अवग्रह' वा 'आडवी रेघ ' दिली जाते.
उदा. धा S, धिं S धागेना इ.
याच ताल लिपी पद्धतीप्रमाणे दादरा ताल खालील प्रमाणे -
ताल - दादरा
मात्रा - ६ खंड - २ विभाग - (३ - ३)
टाळी - १ खाली - ४
१ २ ३
धा धीं ना |
×
४ ५ ६
धा तीं ना ।
o
YouTube Link - https://youtu.be/6FIqsWWAnFk?si=Z78aaKue52NCnt2B
Recent Posts
See Allताल लिपी वा बोल लिपी :- तबल्यातील ताल, तालासंबंधीचे बोल-कायदे, रेले, तुकडे इ., मात्रा, खंड, सम, टाळी, खाली यांच्या विशिष्ट चिंन्हांसहित,...
Comments